न्यूझीलंड संघाची आयसीसीच्या क्रमवारीत घसरण

new-zeland
दुबई – यजमान न्यूझीलंड संघाचा भारतीय संघाने त्यांच्याच मैदानावर झालेल्या 5 एकदिवसीय सामन्यात 4-1 ने पराभव केला. या पराभवामुळे न्यूझीलंडच्या संघाला आयसीसी क्रमवारीत फटका बसला आहे. आयसीसी नुकत्याच जाहिर केलेल्या क्रमवारीत एका क्रमांकाने खाली घसरुण चौथ्या क्रमांकावर आला आहे.


सध्या १११ गुणांसह न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे, तर तिसऱ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेच्या नावावरही १११ गुण आहेत. परंतु, दशांशच्या फरकाने आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडच्या पुढे गेला आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला एका गुणाचा फायदा झाला आहे. भारताच्या नावे सध्या १२२ गुण झाले असून क्रमवारीत संघ दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर, १२६ गुणांसह इंग्लंडचा संघ पहिल्यास्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या मालिकेत पाकिस्तानचा ३-२ ने पराभव झाला. पाकिस्तानचा संघ १०२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर तर, ऑस्ट्रेलिया १०० गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

Leave a Comment