दबंग-३ आयटम नंबरवर थिकरणार करिना

kareena-kpoor
लवकरच सलमान खानच्या आगामी दबंग 3मध्ये अभिनेत्री करिना कपूर खान एक आयटम नंबरवर थिरकणार आहे. यापूर्वी देखील ती दंबग 2मध्ये एका आयटम नंबर थिरकली होती. त्यावेळी ते गाणे खुप सुपरहिट झाले होते. यावेळी करिना प्रभुदेवाच्या तालावर थिरकणार आहे.

काही दिवसांपूर्वीच अरबाज खानच्या भेटीला करिना गेली होती. दबंग 3 ची निर्मिती अरबाज खान करणार आहे. ‘दबंग’च्या पहिल्या भागात मलायका अरोरा हिने ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्यावर डान्स केला होता. आता ‘दबंग-३’मध्ये करिना झळकणार असल्यामुळे चाहत्यांना तिच्या या आयटम साँगची उत्सुकता लागली आहे.

या चित्रपटाच्या बाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटासाठी अश्वनी मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान यांची आधीच निवड करण्यात आली होती. तर चित्रपटातील उर्वरीत कलाकारांची निवड ही त्यांची भूमिका कोणती असणार आहे, यावरून करण्यात येणार आहे. तसेच येत्या मार्च महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment