भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार – सचिन तेंडुलकर

sachin-tendulkar
मुंबई – सध्या खेळत असलेला भारतीय संघ हा विश्चचषकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचे कौतुक करताना पुढे तो म्हणाला की भारतीय संघ जगात कोठेही जावून प्रतिस्पर्ध्यांना हरवू शकतो, ही गोष्ट सुखदायक बाब आहे.

सचिन पुढे म्हणाला, की भारतीय संघ संतुलित असल्यामुळे कोठेही चांगले प्रदर्शन करू शकतो. मी ठामपणे सांगू शकतो की भारतीय संघ विश्वकरंडक विजयाचा प्रबळ दावेदार आहे. सचिन इंग्लंड संघाच्या प्रदर्शनाबद्दल म्हणाला, वेस्टइंडिज येथे इंग्लंडने खराब प्रदर्शन केले आहे. परंतु, घरच्या परिस्थितीत त्यांचा एकदिवसीय संघ दमदार आहे. विश्वचषकात कोणताही संघ सुरुवातीपासून विजयी लय प्राप्त करण्यावर निर्भर असणार आहे. इंग्लंड विजयाचा प्रबळ दावेदार आहे. तर, न्यूझीलंडचा संघ छुपारुस्तम साबित होऊ शकतो. न्यूझीलंड भारताविरुद्ध चांगली कामगिरी करू शकला नाही. परंतु, त्यांचा संघ चांगला आहे.

विदेशी खेळपट्टीवर विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ३ मालिका जिंकल्या आहेत. गेल्या वर्षभराच्या काळात भारताने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मायभूमीत ५-१, ऑस्ट्रेलियाला २-१ आणि न्यूझीलंडला ४-१ असे पराभूत केले आहे. भारतीय संघ फक्त इंग्लंडविरुद्धच एकदिवसीय मालिका जिंकू शकला नाही.

Leave a Comment