धोनीपासून फलंदाजांना सावध करणारे आयसीसीचे ट्विट

mahendra-singh-dhoni
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा एकदिवसीय सामना जिंकून भारताने मालिका 4-1 ने खिशात टाकली. महेंद्रसिंग धोनीचे यात पुन्हा एकदा महत्त्व अधोरेखित झाले. ऑस्ट्रेलिया दौ-याच्यावेळी त्याने केलेल्या संथ फलंदाजीमुळे तो टीकेचा धनी झाला होता. त्यानंतर अनेकांनी तर त्याला निवृत्ती घेण्याचा सल्ला देखील देऊन टाकला होता. पण जरी तो फलंदाजीत कमी पडत असला तरी त्याचा मैदानावर यष्टीमागे कोणीही हात धरू शकत नाही.


धोनी यष्टीरक्षण करत असेल तर खेळणारा फलंदाज पुढे जाऊन खेळण्याचा विचारही करणार नाही. आयसीसीनेही आता यावर फलंदाजांना एक प्रकारे सावध करणारे ट्विट केले आहे. आयसीसीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, स्टंपच्या मागे धोनी असताना क्रीज सोडायची नसते.

Leave a Comment