हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईची सशर्त जामिनावर सुटका

dhananjay-desai
मुंबई : आपण यापुढे खटला संपेपर्यंत हिंदू राष्ट्र सेनेच्या एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नाही, अशी हमी पुण्याच्या मोहसीन शेख हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या धनंजय देसाईने उच्च न्यायालयाला दिली. न्यायालयाने त्याची त्याने दिलेल्या या आश्वासनानंतर जामिनावर सुटका केली.

२०१४ मध्ये पुण्यातील एका सभेत धनंजय देसाई याने चिथावणीखोर भाषण केल्यानंतर त्या ठिकाणी दंगल झाली. आयटी प्रोफेशनल मोहसीन शेख याची त्या वेळी हत्या करण्यात आली. १७ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने देसाई याची जामिनावर सुटका केली. पण आदेशाची प्रत काही दिवसांपूर्वीच उपलब्ध झाली. यानुसार, देसाई याचा जामीन अर्ज न्यायालयाने सशर्त मंजूर केला. त्यानुसार, देसाई याने खटला संपेपर्यंत हिंदू राष्ट्र सेनेचे कामकाज पाहायचे नाही, तसेच त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांत सहभागी व्हायचे नाही व भाषणही द्यायचे नाही, असे यात नमूद करण्यात आले होते.

Leave a Comment