नाचणारे उंदीर व्हिडिओत दिसल्याने इस्राएलमधील डोमिनोज पिझ्झा बंद

pizza1
पिझ्झाच्या पिठात उंदीर खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यामुळे इस्राएलमधील डोमिनोज पिझ्झाचे एक रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे.

हाइफा येथील रहिवासी गिल येहुदा यांनी कारमेल पर्वत क्षेत्रातील डोमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये या प्रकाराचे चित्रीकरण केले होते. त्यांनी हा व्हिडिओ यूट्यूबवर प्रकाशित केला. तेथून तो व्हायरल झाला.

येहुदा हे रस्त्यावरून जात असताना त्यांनी रेस्टॉरंटच्या खिडकीतून वाकून पाहिले. त्यावेळी हे रेस्टॉरंट बंद होते. त्यावेळी त्यांना किमान चार उंदीर पिझ्झासाठी असलेले पीठ आणि मसाल्यांनी भरलेल्या खुल्या भांड्यात खेळताना व नाचताना दिसले.
pizza

“आम्ही दुकानाच्या प्रदर्शनी भागात जाऊन त्यांना पाहिले. ते दृश्य अत्यंत किळसवाणे होते, ” असे येहुदा यांनी टाईम्स ऑफ इस्राएल वृत्तपत्राला सांगितले. या प्रकरणाचा तपास इस्राएलच्या आरोग्य मंत्रालयाने करायला हवा, अशी मागणी अनेकांनी केली आहे.

आम्ही येहुदांच्या भावना समजू शकतो. या दृश्याने आम्हाला धक्का बसला आहे, असे डोमिनोजाज पिझ्झाच्या प्रवक्त्याने सांगितले.

ही शाखा स्वच्छतेच्या कामासाठी बंद करण्यात आले आहे. मात्र या रेस्टॉरंटशेजारी बांधकाम चालू असल्यामुळे तेथे गेली काही दिवस उंदराचा उपद्र होत आहे. त्यामुळे या प्रकरणाने आश्चर्य वाटले नसल्याचेही प्रवक्त्याने सांगितले.

Leave a Comment