तुम्ही पाहिली आहे का आलियाची आलिशान व्हॅनिटी व्हॅन

alia
अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ब्रह्मास्त्र या चित्रपटामुळे आणि तिचे रणबीर कपूरशी सुरु असलेल्या अफेअरमुळे चर्चेत आहे. आलियाने नुकतेच तिच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.


तिने ही व्हॅनिटी व्हॅन नुकतीच विकत घेतली. विशेष म्हणजे या व्हॅनचे इंटेरिअर शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केले आहे. सोशल मीडियावर आलियाने व्हॅन एवढी चांगली सजवल्याबद्दल गौरी खानचे आभार मानले. सध्या आलियाचे व्हॅनमधले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


आलियाने काही दिवसांपूर्वी जुहू परिसरात १३ कोटींचे घर विकत घेतले होते. २३०० स्क्वेअर फिटचे हे घर फार आलिशान असल्याचे म्हटले जात आहे. या घराची मूळ किंमत ७ कोटी ८६ लाख रुपये एवढी आहे. पण दुप्पट किंमत देऊन हे घर आलियाने १३ कोटी ११ लाख रुपयांना विकत घेतले. या व्यवहारामुळे सोशल मीडियावर ती ट्रोल झाली होती.

आलियाचे या प्रीमियम फ्लॅटशिवाय जुहूमध्ये आणखीन दोन फ्लॅट आहेत. आलियाने हे फ्लॅट २०१५ मध्ये अनुपम आणि किरण खेर यांच्याकडून विकत घेतले होते. या फ्लॅटची किंमत ५ कोटी १६ लाख आणि ३ कोटी ८३ लाख एवढी होती.

Leave a Comment