डायना पेंटी म्हणते, ‘विच्छा माझी पुरी करा’

diana-panty
अभिनेत्री डायना पेंटीने सैफ अली खान आणि दीपिका पादूकोण यांची मुख्य भूमिका असलेल्या कॉकटेल या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिने या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे कौतुक देखील झाले. पण आता डायनाला अॅक्शन किंवा थ्रिलर चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे.

तिने आपली ही इच्छा एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली. अशा चित्रपटात मला काम करायला आवडते ज्यांची कथा इतर चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. जी एका कलाकाराच्या रूपात तुम्हाला प्रत्येक वेळी एक वेगळे पात्र साकारण्याची संधी देते. तुम्ही अशा चित्रपटांमुळे वेगळे काहीतरी करण्याचे धाडस करता. जे तुम्ही याआधी केलेले नसते.

वेगळे रोल प्रत्येक चित्रपटात साकारणे काहीसे कठीण असते म्हणूनच ते माझ्यातील कलाकाराला प्रेरणा देते, असे म्हणत डायनाने अॅक्शन किंवा थ्रिलर चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. डायनाने अभिनयात पदार्पण करण्याआधी मॉडेलिंग श्रेत्रात आपले करिअर केले होते. मला यातूनच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याचे डायना सांगते.

Leave a Comment