अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड

ramesh-b

मुंबई- अभिनेते रमेश भाटकर यांचे आज मुंबईत निधन झाले.  एलिझाबेथ रुग्णालयात त्याच्यावर कर्करोगावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे. ते 70 वर्षांचे होते.

रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर गायक-संगीतकार वासूदेव भटकर यांच्या घरी 3 ऑगस्ट 1949 मध्ये रमेश भाटकर यांचा जन्म झाला होता. 1977 मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीस वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी 90 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी भूमिका केल्या होत्या

Leave a Comment