इजिप्तमध्ये उत्खननात 40 नव्या ममींचा शोध

piramid
इजिप्तमध्ये एका दफनभूमीत उत्खनन सुरू असताना 40 नव्या ममींचा शोध संशोधकांना लागला आहे. गेल्या वर्षी शोध लागलेल्या या ममी आता जनतेसमोर सादर करण्यात आल्या आहेत.

Egypt

टोलेयिक काळापासून म्हणजे ईसापूर्व 323 ते ईसवी सन 30 पर्यंतच्या काळातील या ममी आहेत.या ममींची संख्या 40 पेक्षा जास्त असल्याची एएफपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

इजिप्तच्या पुरातत्त्व विभागाचे मंत्री खालेद अल-एननी यांनी शनिवारी विविध देशांतील पत्रकार व राजनैतिक अधिकाऱ्यांच्या समक्ष या ममी सादर केल्या. त्यामध्ये पुरुष, स्त्रिया आणि मुलांचा समावेश असून ते बहुतेक एकाच समृद्ध कुटुंबातील असावेत, असे अल-अननी यांनी सांगितले.

“यातील काही जणांना दगड किंवा लाकडांच्या खाली दफन करण्यात आले होते, तर इतरांना मातीत किंवा कबरींच्या खोबणीत दफन करण्यात आले होते,” असे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका वक्तव्यात म्हटले असून या सर्व मम्मी चांगल्या स्थितीत आहेत, असा दावा केला आहे.

हे मंत्रालय आणि मिन्या विद्यापीठातील एका संशोधक गटाने गेल्या फेब्रुवारी महिन्यात मध्य इजिप्तमधील मिन्या येथील दफनभूमीवर हे उत्खनन केले होते. तेव्हा त्यांना या ममी आढळून आल्या होत्या.

Leave a Comment