रस्त्यावरचा खड्डा, नव्हे बँकलुटीसाठी खोदलेले भुयार

surung
भारतात कोणत्याची लहानमोठ्या शहरात अथवा गावात गेलात तर रस्त्यावरील खड्डे ही आम बात आहे. परदेशात तशी परिस्थिती नसते. त्यातून तो अमेरिकेसारखा विकसित देश असेल तर रस्त्यात खड्डे कुठे सापडणार? पण तेथेही समजा खड्डा असलाच तर तो लगेच भरला जाणार याची खात्रीच. फ्लोरिडा राज्य तरी त्याला अपवाद कसे असणार?

police
पण झाले काय कि फ्लोरिडा मध्ये असाच रस्त्यातला खड्डा भरण्यासही मजूर आले, पण त्यांनी तो खड्डा भरायला घेतला मात्र त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी सरळ पोलीस बोलावले. अमेरिकन पोलीस संस्था एफबीआयचे अधिकारी येऊन त्यांनी खड्ड्याचे निरीक्षण केले तेव्हा तो नुसता खड्डा नसून जवळच्या बँकेपर्यंत जाणारे भुयार होते असे दिसून आले. त्याचे फोटो एफबीआयने ट्विटरवर शेअर केले आहेत.

हा खड्डा किंवा भुयार इतके अरुंद होते कि त्यातून जेमतेम एकच माणूस पोटावर सरपटत जाऊ शकेल. पेमब्रोक पाईन्सपासून हे भुयार चेस बँकेपर्यंत खोदले गेले होते. अर्थात बँक लुटण्याच्या इराद्यानेच ते खोदले गेले हे पोलिसांना सांगावे लागले नाही. आजपर्यंत चित्रपट पाहिलेली हि दृश्ये प्रत्यक्षात पाहून पोलीसही हैराण झाले. त्यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे समजते.

Leave a Comment