५ जी नेटवर्क चाचणीनंतर अचानक ३०० पक्षी मृत्युमुखी

birds
सारी दुनिया सध्या अतिवेगवान ५ जी नेटवर्कच्या प्रतीक्षेत असून जगात काही ठिकाणी या नेटवर्कच्या चाचण्या सुरु आहेत. त्यादरम्यान या नेटवर्कमधील काही दोष नजरेस येऊ लागले आहेत. नेदरलँड्सच्या हेग शहरात या नेटवर्क चाचण्या सुरु असताना अचानक सुमारे ३०० पक्षी मरण पावले असून त्यामागे या नेटवर्क मधून झालेले रेडीएशन कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

५ जी बाबत युजरमध्ये असलेली उत्सुकता लक्षात घेऊन अनेक नामवंत स्मार्टफोन उत्पादक कंपन्या बार्सिलोना येथे होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये त्यांचे ५ जी ला सपोर्ट करणारे स्मार्टफोन सादर करत आहेत. या वर्षअखेर भारतही ही सेवा सुरु होणार आहे. त्याचवेळी या नेटवर्कमुळे होऊ शकणारे नुकसान समोर येत आहे. टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन, ईटीएच झुरिक, नॉर्वेच्या सिन्तेफ डिजिटल रिसर्च संस्थेतील संशोधकांनी यावर अनेक पेपर सादर केले आहेत.

या संशोधकांनी ५ जी नेटवर्कमुळे युजरची प्रायव्हसी अतिशय धोक्यात येईल कारण कोणीही हॅकर युजरची माहिती सहज मिळवू शकेल असे म्हटले आहे तसेच या नेटवर्कमुळे होत असलेल्या रेडीएशनचा परिणाम प्राणी. पक्षी, लहान किडे कीटक यांच्यावर होत असून त्यांच्या जीवाला त्यामुळे धोका आहे असाही इशारा दिला आहे. परिणामी संशोधक ५ जी सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यापूर्वी या धोक्यांचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी जोमाने संशोधन करत आहेत असे समजते.

Leave a Comment