रशियन केजीबीच्या वापरातील वस्तूंचे न्यूयॉर्क येथे संग्रहालय

musium
दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची महासत्ता बनण्यासाठी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन याच्यात सुरु झालेली स्पर्धा अजून पुरती संपलेली नाही. आता रशियाचे विभाजन झाले असले तरी अमेरिका रशिया या दोन देशात हि स्पर्धा सुरु आहे पण त्याला कोल्ड वॉर असे म्हटले जाते. त्यामध्ये प्रत्यक्ष युद्धापेक्षा हेरगिरी करून महत्वाची माहिती मिळविण्यावर भर दिला जातो. रशियाची केजीबी ही गुप्तचर संस्था या बाबतीत फारच माहीर समजली जाते.

दुसरया महायुद्धानंतर केजीबीने हेरगिरीसाठी वापरलेल्या वस्तूंचे एक संग्रहालय न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागात बनविले गेले असून या सर्व वस्तू लुथीयानियातील ५५ वर्षीय इतिहासकार उरबॅतीस यांनी ३० वर्षे जगभर फिरून मिळविलेल्या आहेत. अश्या सुमारे ३५०० वस्तू या संग्रहालयात असून त्यात विशिष्ट बटणे, बेल्ट यामध्ये लपविलेले कॅमेरे, लिपस्टिक गन, अनेक आकाराचे मायक्रोफोन, कागदपत्रे लपवून नेता येतील असे खास जोडे, फर्निचर, टाईपरायटर्स, सिगरेट, चहा कप अश्या अनेक वस्तू आहेत. याची माहिती देण्यासाठी केजीबीचा माजी हेर सर्गेई कोलोसोव्ह याची नेमणूक केली गेली आहे.

ज्याने या वस्तू जमविल्या तो उरबेटीस ज्या लीथूआनिया देशाचा नागरिक आहे, तो देश दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत सेनेने जिंकला होता पण त्याला १९९१ मध्ये स्वतंत्र मिळाले असा एकमेव देश आहे.

Leave a Comment