टाटा मोटर्सकडून हॅरिअरसाठी ऑनलाईन कस्टमायझेशन सेवा सुरु

harrier
टाटा मोटर्सची दमदार एसयूव्ही हॅरिअर नुकतीच लाँच झाली असून या एसयुव्ही साठी कंपनीने ऑनलाईन कस्टमायझेशन सेवा सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहक त्यांच्या पसंतीप्रमाणे खरेदी करताना कारमध्ये त्यांना हवे तसे बदल करू शकणार असून हे बदल कंपनीचा करून देणार आहे. त्यामुळे गाडीत हव्या त्या बदलासाठी ग्राहकांना बाहेरून काम करून घेण्याची गरज राहणार नाही. इमॅजीनेटर या नावाने ही सेवा सुरु केली गेली असून त्याची टॅगलाईन यु इमॅजिन, वुई क्रिएट अशी आहे.

या एसयूव्हीला २ लिटरचे क्रायोटेक ४ सिलिंडर डीझेल इंजिन असून सिक्स स्पीड गिअर बॉक्स आहे. ईबीडी, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, सिटबेल्ट रिमायंडर, एअर बॅग्स, ऑफरोड एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, रोलओव्हर मिटीगेशन, सिटी, इको, स्पोर्ट्स मोड, ५० लिटर इंधन क्षमतेची टाकी दिली गेली असून तिची किंमत १२.६९ लाखापासून १६.२५ लाख दरम्यान आहे.

Leave a Comment