‘उरी’च्या धसक्याने तीन चित्रपटांनी रद्द केल्या रिलीज डेट

Uri
लवकरच प्रदर्शित होणाऱ्या इतर 3 चित्रपटांचे धाबे ‘उरी’ चित्रपटाच्या वाढत्या आलेखामुळे दणाणले असल्याचे पाहायला मिळत आहेत. बॉक्स ऑफिसवर अद्यापही ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘उरी’ चित्रपटाची प्रसिद्धी कायम असून चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘उरी’ चित्रपटाचा चढता क्रम पाहता त्यांचा आगामी ‘सोनचिड़िया’ चित्रपटाची रिली़ज डेट पुढे ढकलली आहे. त्याचप्रमाणे आणखी दोन चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १५ मार्च रोजी एक चित्रपट प्रदर्शित होणार होता.

फक्त शंभर कोटींच्या कमाईचा आकडाच उरीने ओलांडला नाही, तर तो २०१९ या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरत असल्याची प्रतिक्रीया खुद्द तरण आदर्श यांनी व्यक्त केली आहे. फक्त २८ कोटींच्या निर्मिती खर्चात चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री यामी गौतम यांच्या महत्त्वाच्या भूमिका असून दहाव्या दिवशी या चित्रपटाने कोट्यवधींच्या कमाईचे शतक पूर्ण केले आहे.

Leave a Comment