इजिप्तमधील तुतानखामूनच्या कबरीला नवी झळाळी

egypt
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या इजिप्तमधील तुतानखामून या राजाच्या कबरीला नवी झळाळी मिळाली आहे.

कैरोपासून सुमारे 400 अंतरावरील किंग्ज नदीच्या खोऱ्यातील लक्सोर येथे उत्खननात राजा तुतानखामूनची कबर मिळाली होती. त्याच्या शवपेटीत प्रचंड प्रमाणात सोन्याची संपत्ती, सोन्याचा मुखवटा आणि सोन्याने मढवलेल्या अनेक गोष्टी आढळल्या होत्या. या कबरीचे नुकतेच नवीनीकरण करण्यात आले. गुरुवारी हा प्रकल्प माध्यमांसाठी खुला करण्यात आला. या नूतनीकरण कार्यक्रमाचे अमेरिकी संचालक नेव्हिल अॅग्न्यू यांनी पत्रकारांना या प्रकल्पाची माहिती दिली.

या कबरीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या श्वासाचा ओलावा आणि कार्बन डाय ऑक्साईडमुळे या कबरीतील चित्रांवर सूक्ष्मजीव उगवतील आणि त्यामुळे कबरीच्या भिंतीवर डाग पडतील, अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली होती, असे ईएफई वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

त्यामुळे अमेरिकेतील गेटी कन्झर्वेशन इन्स्टिट्यूट आणि इजिप्तच्या पुरातत्त्व मंत्रालयाने या कबरीच्या नूतनीकरणाचा प्रकल्प राबविला. गेल्या आठवड्यात हा प्रकल्प पूर्ण झाला.

तुतानखामून ही ख्रिस्तपूर्व 14 व्या शतकात झालेला इजिप्तचा राजा होता. हॉवर्ड कार्टर या ब्रिटिश इजिप्ततज्ञाने 1922 मध्ये या कबरीचा शोध लावला होता. तुतानखामून याचा अर्थ “अमुनची छाया असलेला” असा होतो.

Leave a Comment