मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक टाळण्यासाठी रॉबर्ट वाड्रांची धावाधाव

robert-wadra
नवी दिल्ली – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आज पटियाला हाऊस न्यायालयामध्ये या जामीनावर सुनावणी होईल. हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंग त्यांचे मित्र सुनील अरोरा यांच्याशी संबंधित आहे.

सक्तवसुली अंमबलजावणी संचालनालयाने (ईडी) सुनील अरोरा यांच्यावर लंडनच्या १२ ब्रायनस्टन स्क्वेअर येथील १९ लाख पाऊंड किमतीच्या फ्लॅट खरेदी प्रकरणात खटला दाखल केला होता. अरोरा यांना या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून रॉबर्ट वाड्रा यांची ही मालमत्ता असल्याचा ईडीचा दावा आहे. आपल्याला या प्रकणात अटक होऊ नये म्हणून, वाड्रा यांनी हा जामीन अर्ज दाखल केला आहे.

संजय भंडारी याने लंडन येथील हा फ्लॅट १६ कोटी ८० लाख रुपयांमध्ये विकत घेतला होता. या फ्लॅटच्या दुरुस्तीसाठी ६५ हजार ९०० पाऊंडचे अतिरिक्त खर्च करण्यात आले होते. असे असूनही २०१०मध्ये वाड्रा यांच्या एका कंपनीला तो विकण्यात आला, असा ईडीचा दावा आहे.

Leave a Comment