…अन्यथा आम्ही उभारू राम मंदिर – मोहन भागवत

mohan-bhagwat
प्रयागराज – लवकरात लवकर भव्य राम मंदिराचे अयोध्येत निर्माण व्हावे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा असून राम जन्मभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राम मंदिर हवे आहे. याशिवाय संघाला काहीही नको. यासंदर्भात येणाऱ्या ४-६ महिन्यात काही निर्णय झाला तर ठीक, अन्यथा आम्ही सर्व जण एकत्र येऊन राम मंदिर उभारू, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संगाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश येथे आयोजित धर्म संसदेच्या दुसऱ्या दिवशी बोलत होते.

भागवत पुढे म्हणाले, कि संबंधित प्रस्ताव राजकीय पक्षांमध्ये हिंमत असेल तर मान्य करावा, अन्यथा माघार घ्यावी. वर्षा मागून वर्षे निघून जात आहेत, तारखेवर तारीख न्यायालयात लागत आहे. पण निकाल लागत नाही. केवळ भव्य राम मंदिरच राम जन्म भूमीवर होईल.

अनेक लोक सध्याच्या सरकारमध्ये आहेत, ज्यांना राम जन्मभूमीवर मंदिराचे भव्य निर्माण व्हावे, असे वाटते. पण काही असे देखील लोक आहेत, जे मंदिर निर्माणात अडथळा आणत आहेत. राम मंदिर निर्माणाचा सरकारने मुद्दा मुख्य बनवला तर त्यांना प्रभू रामचंद्रांचा आशिर्वाद मिळेल, असेही भागवत यांनी म्हटले आहे.

Leave a Comment