मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पावर मुडीजचे ताशेरे

moodys
नवी दिल्ली – पतमानांकन संस्था ‘मुडीज’ने केंद्र सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प नकारात्मक असल्याचे म्हटले असून सलग ४ वर्षे राजकोषीय तुटीच्या लक्ष्यापर्यंत न पोहोचणे नकारात्मक आहे, असे मुडीजने म्हटले आहे.

२०१९-२० मध्येही केंद्र सरकारला ३.४ टक्क्यांच्या राजकोषीय तुटीचे लक्ष पूर्ण करणे कठीण होणार असल्याचे मुडीजने म्हटले आहे. अनेक धोरणांचा अंतरिम अर्थसंकल्पात राजस्व वाढवण्याबाबत अभाव आहे. ज्यामुळे खर्च वाढेल अशा अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे उपभोग वाढेल पण अर्थव्यवस्थेवर भार वाढेल, असेही मुडीजने म्हटले आहे.

अर्थसंकल्पात अंदाज बांधला गेला आहे की सध्याच्या वित्त वर्षात राजकोषीय तोटा ३.४ टक्के असणार आहे. मात्र, लक्ष ३.३ टक्क्यांचे होते, असेही मुडीजने म्हटले आहे. गेल्या २ वर्षांतील राजकोषीय तुटीचे लक्ष पाहता आमचा अंदाज आहे की, २०२० वित्त वर्षांमध्येही सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असेही मुडीजने सांगितले.

Leave a Comment