‘मायकल जॅक्सन शो’ होणार भारतात

michael-jackson
किंग ऑफ पॉप म्हणून जगभरात नावलौकिक मिळवलेल्या मायकल जॅक्सनला अभिवादन देण्यासाठी ‘आयएम किंग – द मायकल जॅक्सन एक्सपिरियन्स’ हा शो भारतात होणार आहे. 13 ते 17 मार्चला सात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘आयएम किंग – द मायकल जॅक्सन एक्सपिरियन्स’ ही लाईव्ह कॉन्सर्ट मुंबई आणि बंगळूरात होणार आहे. मुंबईच्या एनसीपीए आणि बंगळूरुच्या सेंट जॉन ऑडिटोरियममध्ये याचे सात शो 13 ते 17 मार्च या दरम्यान होणार आहे. या शोची ऑनलाईन तिकीट विक्री केली जाणार आहे.

या शोमध्ये बॅड, बिल्ली जीन, थ्रिलर आणि ह्युमन नेचर या मायकल जॅक्सनच्या लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. टॅलेंटेड म्यझिशियन्स, ब्रॉडवे आणि लास वेगास येथील डान्सर्सचा या शोमध्ये समावेश असेल.

Leave a Comment