आयसीसीने जाहिर केले विश्वचषक २०१९ च्या सराव सामन्यांचे वेळापत्रक

world-cup
दुबई – इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकातील सराव सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने नुकतेच जाहीर केले आहे. सर्व संघाना यामध्ये विश्वचषकापूर्वी तयारीसाठी शेवटची संधी असणार आहे. विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला यात २ सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.


विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यासोबत भारत ३० मे पासून सराव सामने खेळणार आहे. स्पर्धेतील सर्व १० संघ २ सराव सामने खेळणार आहेत. हे सर्व सराव सामने इंग्लंड आणि वेल्सच्या ४ ठिकाणी होणार आहेत. हे सर्व सराव सामने २४ मे ते २८ मे दरम्यान ५ दिवस खेळविण्यात येणार आहे. या सामन्याचे ब्रिस्टल, कार्डिफ, हॅपशर बाउल याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. २५ मे रोजी भारत न्यूझीलंडसोबत आणि २८ मे रोजी बांगलादेश बरोबर सामना खेळेल. हे सर्व सामने ५० षटकाचे होणार आहेत. याला एकदिवसीय सामन्याचा अधिकृत दर्जा नसेल. सर्व संघाने त्यांचे १५ खेळाडू मैदानात उतरवू शकतील.

Leave a Comment