एकाच वेळी दोन पुरुषांकडून प्रेग्नेंट झाली महिला, दिला जुळ्या मुलांना जन्म

gay
टोरंटो – गेल्यावर्षी कॅनाडामध्ये राहणा-या एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. पण ही मुले एका विशिष्ट कारणामुळे खास होती. एकाच वेळी या मुलांचा जन्म झाला होता आणि यांना एकाच आईने जन्म दिला होता. पण यांचे वडील वेगवेगळे होते आणि ही गोष्ट सगळ्यांना कळल्यानंतर सर्वच हैराण झाले होते. IVF तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले. महिलेने याच्या मदतीने सरोगेट मदर बनून एका वेळी दोन पुरुषांच्या मुलांना जन्म दिला. या मुलांची जोडी वेगवेगळे पिता असणारी ब्रिटेनची पहिली जोडी आहे.
gay1
लंडनमध्ये राहणारे गे-कपल सिमोन बर्ने एडवार्ड्स आणि ग्रीम बर्न-एडवर्ड्सची ही गोष्ट आहे. आपले कुटूंब पुर्ण करण्यासाठी या दोघांना एक मुल हवे होते. पण हे नैसर्गिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे तंत्रज्ञानाची त्यांनी मदत घेतली. आता हे दोघे जुळ्या मुलांचे वडील बनून खुप आनंदी आहेत.
gay2
IVF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कपलला स्वतःचे मुल हवे होते. पण दोन भ्रूणांसाठी वेगवेगळ्या वडिलांचे स्पर्म घेण्यावर ब्रिटेनमध्ये बंदी असल्यामुळे हे शक्य नव्हते. हे कपल यामुळे एका सरोगेट मदरच्या शोधात कॅनडाला पोहोचले. कॅनाडामध्ये गेल्यानंतर या दोघांची भेट मेग स्टोन(32) नावाच्या महिलेसोबत झाली. ही महिला पहिलीच दोन मुलांची आई होती. ती तिच्या पार्टनरपासून काही काळापुर्वीच वेगळी झाली होती आणि तिला दूसरे मुल नको होते. पण या दोघांना भेटल्यानंतर ती त्यांची मदत करण्यासाठी स्वतःचे गर्भाशय भाड्याने देण्यासाठी तयार झाली.
gay3
हे कपल IVF च्या मदतीने एका नाही तर दोन मुलांचे पिता बनले. त्यांनी आपल्या मुलांची नावे एलेक्जेंड्रा आणि केल्डर अशी ठेवली आहेत. त्यांचे या कामासाठी 25 पाउंड म्हणजेच जवळपास 23.5 लाख रुपये खर्च झाले. दोन्ही मुलांमधून ग्रीम हा केल्डरचा (मुलगा)पिता आहे तर सिमोन एलेक्जेंड्राचा (मुलगी) पिता आहे. या कपलने IVF च्या माध्यमातून प्रेग्नेंसीसाठी एका महिलेकडून स्त्रीबीज घेतले. ते स्त्रीबीज घेऊन नंतर ते फर्टिलिटी क्लिनिकमध्ये पोहोचले. येथे सिमोन आणि ग्रीमचे स्पर्म घेऊन ते स्त्रीबीज विकसित करण्यात आले. याच्या सहा महिन्यांनंतर या भ्रूणाचे प्रत्यारोपण मेगच्या गर्भात करण्यात आले. दोन आठवड्यांनंतर मेग गरोदर राहिली.
gay4
याबाबत या कपलने सांगितले की, बाळाचा जैविक पिता आम्हा दोघांमधून कोण असेल हे आम्ही ठरवू शकत नव्हतो. कारण हा हक्क आम्हा दोघांमधून फक्त एकालाच मिळू शकला असता. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, तुम्ही दोघेही बाळाचे जैविक पिता बनू शकता. डॉक्टर आम्हाला म्हणाले की, ते अर्धे भ्रूण सिमोनच्या स्पर्मपासून आणि अर्धे भ्रूण ग्रीमच्या स्पर्मने फर्टाइल करतील. या कपलने मेगला भेटल्यानंतर एकमेकांसोबत लग्नही केले. या दोघांना मेगला भेटल्यानंतर असे वाटत होते की, ते त्यांच्या बहिणीला भेटले आहे. ते म्हणाले की, आम्ही तिचे खुप आभार मानले कारण तिने आमचे आयुष्य बदलले. हे कपल मुलांविषयी बोलताना म्हणाले की, हे आमचे मुल आहे यावर आमचा विश्वास बसत नव्हता. आम्ही दोघेही पिता बनलो होतो. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. या कपलमधील सिमोन बिझनेस डेव्हलपमेंटचे काम करतो. तर ग्रिम घरी राहून मुलांना सांभाळतो. या कपलने काही काळापुर्वीच आपल्या दोन्ही मुलांचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट केला आणि या वेळी त्यांनी शानदार पार्टीही दिली. यामध्ये मेगही उपस्थित होती.

Leave a Comment