नरबळीसाठी परवानगी द्या – मांत्रिकाची अजब मागणी!

mantrik
बिहारमधील बेगूसराय येथे एका मांत्रिकाने केलेल्या मागणीमुळे प्रशासनही चक्रावले आहे. आपल्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी चक्क नरबळी देण्याची मागणी या मांत्रिकाने केली आहे.

या मांत्रिकाने सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केला आहे. नरबळी हा गुन्हा नाही आणि मी सर्वात आधी माझ्या इंजीनियर मुलाचा बळी देईल, असा दावा या मांत्रिकाने केला आहे. ‘‘मा कामाख्याने मला नरबळीचा आदेश दिला आहे. मी सर्वात आधी माझ्या इंजीनियर मुलाचा बळी देईल. त्याने माझ्या मंदिरासाठी आर्थिक मदत देण्यास नकार दिला आहे. तो रावणासारखा आहे,’’ असे या मांत्रिकाने व्हिडिओत म्हटले आङे.

मोहनपुर पहाडपुर या गावात राहणाऱ्या सुरेंद्र प्रसादसिंह नावाच्या या मांत्रिकाने 29 जानेवारी रोजी बेगूसरायच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. या पत्राचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, असे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. ‘‘बिंदु मां मानव कल्याण संस्था’’ नावाच्या एका संस्थेच्या लेटरहेडवर हे पत्र लिहिण्यात आले आहे. आपण या संघटनेचे प्रमुख असून ही संस्था नोंदणीकृत असल्याचा दावा त्याने केला आहे. मात्र हे पत्र आपल्याला मिळाले नसल्याचे उपविभागीय अधिकारी संजीवकुमार चौधरी यांनी सांगितले.

‘‘हे गंभीर प्रकरण आहे. नरबळी अवैध आहे. आम्ही हे पत्र आणि मांत्रिकाचा शोध घेत असून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल,’’ असे ते म्हणाले.

Leave a Comment