अलिगड – उत्तर प्रदेश पोलिसांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून तो जाळल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावर महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिवशीच घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती. या घटनेवर देशभरातून टीकेचा भडिमार करण्यात आल्यानंतर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या १३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या १३ जणांवर गुन्हा दाखल
महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळ्या मारून त्याचे अखिल भारतीय हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे या महिलेने दहन केले होते. हा धक्कादायक प्रसंग नौरंगाबाद येथील हिंदू महासभेच्या कार्यालयाबाहेर घडला होता. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचा दिवस हा शौर्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणाही हिंदू महासभेने केली होती. आयपीसीच्या कलम १४७, १४८ व १४९ नुसार याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.