मामुटी-सनी लिओनच्या फोटोवर लोकांच्या अश्लिल कॉमेंट्स

sunny-leone
आगामी ‘मधुरा राजा’ या मल्याळम चित्रपटात सुपरस्टार मामुटीसोबत अभिनेत्री सनी लिओन स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटातील एक फोटो काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. लोकांनी यावर अश्लिल कॉमेंट्स करायला सुरूवात केल्यानंतर हा फोटो आता फेसबुकवरुन हटवण्यात आला आहे.

मामुटीसोबत या फोटोत सनी लिओन एका सोफ्यावर बसलेली दिसते. अनेक लोकांचा गराडाही त्यांच्या भोवती दिसत आहे. हे दृष्य या चित्रपटातील एका आयटम साँगमधील असल्याचे सांगितले जाते. अनेकांनी हा फोटो पाहून कौतुक केले असले, तरी काही जणांनी दोघांवरही बोचरी टीका केली आहे.


हा फोटो दाक्षिणात्य अभिनेता अजू वर्गीस याने सोशल मीडियावर शेअर केला आणि फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ‘अक्का विथ इक्का’ याचा अर्थ आहे, ‘ताईसोबत दादा’ असे असले तरी अश्लिल कॉमेंट्स करायला काही लोकांनी सुरुवात केल्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. सध्या ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’ या आगामी मल्याळम चित्रपटात सनी लिओन काम करीत आहे.

Leave a Comment