1 मार्चपासून राजस्थानातील बेरोजगारांना मिऴणार भत्ता

ashok-gahlot
जयपूर : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानातील बेरोजगारांना 1 मार्चपासून भत्ता मिळेल, अशी घोषणा केली आहे. राजस्थान विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन काल अशोक गेहलोत यांच्या हस्ते झाले. ते त्यावेळी बोलत होते. मुलांना तीन हजार तर मुलींना तीन हजार पाचशे रुपये भत्ता मिळणार आहे.

2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी राजस्थानातील शेतकऱ्यांना दिल्यानंतर बेरोजगार युवकांना आता रोजगार भत्ता देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले आहे. काँग्रेसचे सरकार देशात आले तर काँग्रेसही गरिबांनी किमान वेतन देईल अशी घोषणा राहुल गांधींनी केली होती.

काँग्रेसचा 2019 मध्ये विजय झाला तर काँग्रेस सरकार मिनिमम इन्कम गॅरंटी म्हणजे किमान उत्त्पन्नाची हमी देईल. याचा अर्थ असा की भारतातील प्रत्येक गरीब व्यक्तीच्या बँक खात्यात एक निश्चित रक्कम किमान उत्त्पन्नाच्या रूपात सरकार देईल, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रायपूर येथे झालेल्या किसान आभार संमेलनात केली होती. अशोक गेहलोत यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरल्यास राहुल गांधींची ही घोषणा प्रत्यक्षात येणं शक्य असल्याचं मानलं जात आहे.

Leave a Comment