आईसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे सारा

sara-ali-khan
२०१८ मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटातून सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर तिचा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ हा चित्रपटही गाजला. साराने आता कामातून थोडी सवड काढत आईसोबत सहलीचा आनंद घेत आहे. सर्वांनीच सारा अलीच्या अभिनयाची वाहवा केली आहे. तिचा पहिल्या चित्रपटातील प्रभाव ओसरण्यापूर्वीच तिचा ‘सिम्बा’ही आल्यामुळे तिने आपला स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला आहे.


ती ‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंहसोबत झळकली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाल केली. सारा अली आता या यशानंतर आई अमृता सिंगसोबत केनियात पोहोचली आहे. इन्स्टाग्रमावर तिने दोन सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. ती यात आईसोबत मसाइ मारा नॅशनल रिजर्व पार्कमध्ये आनंद घेताना दिसते. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘ईल्डर अँड वाईल्डेस्ट इन द वर्ल्ड.’ आपल्या आईसोबत सारा अली खान खूप घट्ट नाते ठेवून आहे. तिला पाहिल्यानंतर सर्वांनीच ती आईसारखी दिसते असे म्हटले आहे.

Leave a Comment