भाऊ म्हणून सैफ अली तर पत्नी म्हणून करिना चालेल -सिद्धार्थ मल्होत्रा

siddharth-malhotra
नुकतेच कॉफी विथ करणच्या एका भागात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आदित्य रॉय कपूरने हजेरी लावली. सिद्धार्थनेही यावेळी बोलताना एक धक्कादायक खुलासा केला आहे.


करणने या भागातील एका राऊंडमध्ये सिद्धार्थला काही प्रश्न विचारले. यातच तुला कोणत्या अभिनेत्रीला पत्नीच्या रूपात पाहायला आवडेल? असा प्रश्न केला असता क्षणाचाही विलंब न करता सिद्धार्थने करिना कपूरचे नाव घेतले. तर सैफ अली खानला भावाच्या रूपात पाहायाला आवडेल, असे म्हटले. शोला या सर्व गप्पांमुळे एक वेगळीच रंगत आली. त्यामुळे सिद्धार्थ आणि आदित्यच्या चाहत्यांसाठी हा भाग अधिक खास असणार आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली असून करणने अनेक कलाकारांची पोलखोल केली आहे.

Leave a Comment