संसदेतही झाले विकी कौशलच्या ‘उरी’चे कौतुक

piyush-goyal

विकी कौशलचा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. 2019 या वर्षातला हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. संसदेतही आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये ‘उरी’चा जोश दिसून आला. संसदेत विकी कौशलच्या ‘उरी’ या चित्रपटाचे कौतुक करण्यात आले.

केंद्रीय अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी अर्थसंकल्पामध्ये चित्रपटसृष्टीतील काही योजना जाहीर करताना ‘उरी’चा उल्लेख केला. त्यानंतर संपूर्ण संसदेमध्ये ‘हाउज द जोश’ चा जयघोष सुरु झाला.

यावेळी पीयुष गोयल म्हणाले की, ‘अनेक वेळा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी किंवा प्रदर्शित झाल्यानंतर तो लीक होतो. मात्र हे होऊ नये यासाठी आम्ही तरतूद करणार आहोत. पायरसी रोखण्यासाठी कठोर कायदा आणू.’ अशी घोषणा गोयल यांनी केली.

Leave a Comment