आमच्या नादाला लागाल तर, रस्त्यावर ठाकरे कुटूंबियांची अब्रू काढू – निलेश राणे

nilesh-rane
मुंबई – पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी टीका केली आहे. निलेश राणे यांनी ठाकरे कसे आहेत कळल्यावर लोकच अंगावर कपडे ठेवणार नसल्याचे म्हटले आहे. निलेश राणे यांनी याआधी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूसाठी बाळासाहेब ठाकरेंना जबाबदार ठरवले होते. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंनी सोनू निगमच्याही हत्येचा कट रचला होता असा आरोप करुन खळबळ माजवली होती.

बाळासाहेबांबद्दल आम्ही काय बोलायचे नाही का. तुझ्या देवहाऱ्यात तुझा देव ठेव मी माझा देव माझ्या देवहाऱ्यात ठेवीन. आमच्या नादाला लागाल तर ठाकरे कुटूंबियांची अब्रू रस्त्यावर काढू. आम्हाला मातोश्रीच्या कोणत्या माळ्यावर काय काय चालायचे माहिती आहे. ठाकरे कसे आहेत कळल्यावर लोकच अंगावर कपडे ठेवणार नसल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर निलेश राणे यांनी शेलक्या शब्दांत मला वाटले होते खूप मोठा उद्रेक होईल. माझ्या वक्तव्याने शिवसैनिक चवताळतील, अंगावर येतील. पण यांच्या एकाच्यातही दम नसल्याची टीका केली. खरे काय आहे हे शिवसैनिकांनाही चांगलेच ठाऊक आहे.

Leave a Comment