मोहन भागवतांनी विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत राममंदिरावर बोलणे टाळले

mohan-bhagwat
प्रयागराज : 21 फेब्रुवारीला अयोध्येत जाऊन राममंदिराची पहिली वीट रचण्याचा प्रस्ताव प्रयागराजमधील साधूसंताच्या धर्मसंसदेत मान्य झाला. पण काल सरसंघचालक मोहन भागवतांनी विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत राममंदिरावर बोलणे टाळले. धर्मसंसदेतील साधू-संतांचे मोहन भागवत यांच्या भूमिकेकडे लक्ष होते. पण राममंदिरावर भागवतांनी मौन बाळगले.

हिंदू धर्म तोडण्यासाठी कट कारस्थाने शिजत असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी केला आहे. मोहन भागवतांनी या संसदेत बोलताना शबरीमलाच्या मुद्दाही उचलून धरला. कोणत्याही हिंदू महिलांना मंदिरात दर्शनाला जायची इच्छा नाही. तेव्हा काही गट श्रीलंकेतून महिलांना आणून मंदिरात घुसवत असल्याचा आरोप भागवतांनी केला. कालपासून विश्व हिंदू परिषदेची 2 दिवसीय धर्मसंसद सुरू झाली.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, योगगुरू रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. मोदी सरकारने आश्वासने देऊनही साडे चार वर्षात राम मंदिराची वीटही न रचल्याने या धर्म संसदेत राम मंदिरावर विहिंप काय भूमिका घेईल, हे पाहणे महत्वाचे होते, पण सरसंघचालक मोहन भागवतांनी काल राममंदिरावर बोलणे टाळले.

Leave a Comment