जगातील कोणत्याही महिला क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम मितालीने केला

mithali-raj
सध्या न्यूझीलंडमध्ये भारतीय महिला संघ एकदिवसीय मालिका खेळत असून भारत ३ सामन्यांच्या या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. पण भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे शरणागती पत्करल्याचे दिसून आले. केवळ १४९ धावांवर भारताचा डाव बाद झाला. पण ते असले तरी जगातील कोणत्याही महिला क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम भारताची कर्णधार मिताली राज हिने केला. मैदानावर आज मिताली राज हिने उतरून भारताचे २०० व्या एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केले. ती एकदिवसीय सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.

Leave a Comment