…अन् कपिल शर्माने मागितली नरेंद्र मोदी यांची माफी

Kapil-Sharma

कपिल शर्मा याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे. एका ट्विटमुळे कपिल शर्मा यांनी मोदी यांची जाहीर माफी मागितली आहे.

‘मी महनगरपालिकेचा मागील 5 वर्षात 15 कोटीचा कर भरला आहे. तरीही मी पुन्हा मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना माझ्या ऑफिससाठी 5 लाखाची लाच दिली.’ असे ट्विट कपिल शर्माने  9 सप्टेंबर 2016 मध्ये केले होते. आणि ‘यह है आपके अच्छे दिन’ असा सवाल ही केला होता. या प्रकरणी आता  कपिल शर्मा याने पंतप्रधान मोदी यांची माफी मागितली आहे.

मोदी व अभिनेता राजकुमार राव यांच्या नुकतीच भेट झाली होती. मोदींनी राजकुमार राव यांना कपिलला त्याच्या लग्नाच्या शुभेच्छा पोहोचवण्याचा निरोप दिला होता, यावेळी मोदींच्या चेहऱ्यावर राग दिसत होता, असे राजकुमार रावने कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितले. त्यानंतर कपिल शर्माने मोदी यांची कार्यक्रमात जाहीर माफी मागितली.

Leave a Comment