युजरच्या डेटासाठी फेसबुक देत आहे दरमहा एवढे रुपये

facebook
फेसबुकवर केंब्रिज अॅनालिटीका प्रकरणानंतर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती. फेसबुकच्या डेटा प्रायव्हसीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता फेसबुक पुन्हा एकदा वादात अडकले आहे.

एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, 2016 पासून एक रिसर्च प्रोजेक्ट फेसबुक करत आहे. युजर्सचा डेटा त्यासाठी वापरण्यासाठी फेसबुककडून पैसे दिले जात आहेत. युजर्सना पैसे देऊन ‘फेसबुक रिसर्च’ VPN अॅप इन्स्टॉल करण्यास फेसबुकने सांगितले आहे. फेसबुकला यामुळे युजरच्या फोन आणि वेब कनेक्टिव्हिटीचा अॅक्सेस मिळतो.

फेसबुक युजरला या अॅक्सेससाठी 20 डॉलर म्हणजेच 1400 रुपये देते. युजर्सचे वय यात 13 ते 25 च्या दरम्यान आहे. या माध्यमातून फेसबुक वापराच्या सवयीबाबचा डेटा एकत्र करत आहे. हा प्रोजेक्ट सध्या तरी बंद करण्याचा विचार फेसबुकचा नसल्याचे टेकक्रंचने म्हटले आहे.

फेसबुक युजरला पैसे देऊन वेब सर्च, लोकेशन, सोशल मीडिया अॅप्स आणि इतर डेटा वापरण्याची परवानगी मिळवते. अॅपलने ज्या अॅपवर बंदी घातली आहे त्या अॅपप्रमाणेच फेसबुकचे VPN अॅप आहे. अॅपलने अशा प्रकारच्या अॅपवर प्रायव्हसीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणाने बंदी घातली आहे.

Leave a Comment