अर्थसंकल्प 2019 – शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार सहा हजार रुपये

budget
नवी दिल्ली – मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठी भेट दिली असून सहा हजार रुपये अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील, अशी घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. या योजनेचा लाभ १२ कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शुक्रवारी लोकसभेत हंगामी अर्थसंकल्प पीयूष गोयल यांनी सादर केला. मध्य भारतातील विधानसभा निवडणुकांतील पराभवाचे प्रमुख कारण ठरलेल्या शेतकरी असंतोषावर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. केंद्र सरकारने अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार आहे. हे पैसे २ हेक्टर जागा असलेल्या शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दिले जातील. केंद्र सरकारने या योजनेसाठी वर्षाला ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी २२ पिकांचे हमीभाव दीड पटांनी वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment