अर्थसंकल्प 2019 : मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, 5 लाखांपर्यंत उत्पन्न ‘टॅक्स फ्री’

tax
नवी दिल्ली – मोदी सरकारचा अंतिम अर्थसंकल्प पीयूष गोयल यांनी आज सादर केला. या अर्थसंकल्पात करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांहून थेट 5 लाख रुपये करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 3 कोटी करदात्यांना लाभ मिळणार आहे. 40 हजारापर्यंत व्याजही करमुक्त करण्यात आले आहे. 80 सी अन्वये वजावटीची मर्यादा 1 लाख 50 लाख रुपये कायम ठेवण्यात आली आहे.

यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकरी, नोकरदारवर्ग केंद्रित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने कामगार क्षेत्रावर विशेष भर दिला आहे. सरकारने ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविली आहे. आता 20 लाख रुपये मिळणार आहे.

Leave a Comment