2019च्या निवडणूकीसाठी भाजपचा नवा नारा; अबकी बार 400 के पार

BJP
नवी दिल्ली – अबकी बार मोदी सरकार घोषणा देत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. ‘अबकी बार ४०० के पार’ हा नवा नारा भाजपने तयार केला आहे. यावेळी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. एनडीएने २०१४ लोकसभा निवडणुकीत ३३६ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये एकट्या भाजपने २८२ जागांवर विजय मिळवला होता.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ४०० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. भाजपने २०१४ लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करत ‘अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा दिली होती. मोदी सरकारने ज्याप्रकारे गेल्या साडेचार वर्षांत काम केले आहे ते पाहता जनतेला पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पहायचे आहे. १९८४ नंतर पहिल्यांदाच पूर्ण बहुमताने सरकार स्थापन झाले होते. अनेक महत्त्वाचे निर्णय भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतरच घेण्यात आले. भाजप यावेळी लोकसभा निवडणुकीत ४०० चा आकडा सहज पार करेल, असा विश्वास भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment