‘या’ अभिनेत्रीच्या घरी दुसऱ्यांदा हलणार पाळणा !

pregnant
अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. समीरा रेड्डी काल रात्री लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली. प्रेग्नंसीनंतर समीरा पहिल्यांदा पब्लिक इव्हेंटमध्ये दिसली.
Sameera-Reddy
समीरा रेड्डीने दिलेल्या मुलाखतीत प्रेग्नंसीच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘होय, मी दुस-यांदा आई होणार आहे.2019 मध्ये आम्हाला दुसरे बाळ व्हावे, अशी माझी व अक्षयची इच्छा होती. जुलैमध्ये मी बाळाला जन्म देईल. यामुळे मी अनेक प्रोजेक्ट नाकारले.’ असे समीराने यावेळी सांगितले.
Sameera-Reddy1
समीराने 21 जानेवारी 2014 रोजी मराठमोळा उद्योजक आणि ‘वेर्देची’ या सुपरबाईक्स कंपनीचा मालक अक्षय वर्देसोबत लग्न केले होते. 25 मे 2015 रोजी समीराने आपल्या पहिला मुलाला जन्म दिला होता.
Sameera-Reddy2
समीराने 2002 मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

Leave a Comment