सोनीचा खास एक्सझेड ४ येतोय ५२ एमपी कॅमेरयासह

sonyxz4
स्मार्टफोनचा वापर जसा वाढत चालला आहे तसे स्मार्टफोनचे कॅमेरे हे ग्राहकांचे आकर्षण बनू लागले आहेत. परिणामी बहुतेक स्मार्टफोन कंपन्या आता रिअरला तीन चार कॅमेरे देऊ लागल्या आहेत. हॉनरने ४८ एमपी कॅमेरा फोन सादर केला आहे त्यापाठोपाठ शाओमी ४८ एमपी कॅमेरा फोन बाजारात आणत आहे. या सर्वांवर कडी करत जपानी सोनीने ५२ एमपी कॅमेरा असलेला फोन बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे.

सोनीच्या लोकप्रिय एकस्पिरिया सिरीज मधील एक्सझेड ४ बाजारात येण्यापूर्वी त्याची फिचर लिक झाली आहेत. या फोनला रिअरला १६, ५२ आणि ०.३ एमपीचे टाईम ऑफ फ्लाईट सेन्सरवाले ट्रिपल कॅमेरे दिले गेले आहेत. ओलेड स्क्रीन, ६ जीबी रॅम, ८५५ स्नॅपड्रॅगन चीपसेट, अँड्राईड ९.० पाय ओएस, १२८ जीबी स्टोरेज आणि ४४०० एमएएच बॅटरी अशी त्याची अन्य फिचर आहेत. हा फोन खरेदी करण्यासाठी साधारण ७९९९० रुपये मोजावे लागतील असे सांगितले जात आहे.

Leave a Comment