देशातील या मंदिरात 83 वर्षांपासून होतो मिरची पावडरने अभिषेक

tamilnadu
आपल्या देशात आगळ्यावेगळ्या परंपरांची कमी नाही. त्याचप्रमाणे मंदिरांची देखील कमी नाही. विशेष करुन दक्षिण भारतातील मंदिरांची शैली आणि बांधणी खुपच आगळी वेगळी असून तेथील परंपरादेखील अजबच आहेत. त्यातच एक असे मंदिर जेथे रोगांपासून दूर राहण्यासाठी चक्क मिरचीच्या पावडरने अभिषेक केला जातो.
tamilnadu1
तामिळनाडूतील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या वेलुप्पुरममध्ये जगप्रसिद्ध ऑरोविले इंटरनॅशनल टाउनशिपजवळील इद्यांचवाडी येथे वर्ना मुथ्थु मरियम्मन मंदिर आहे. येथे सालाबादप्रमाणे 8 दिवस असा सण साजरा केला जातो, ज्यात होणार मिरची पावडरचा अभिषेक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा होतात. हे करण्यामागे निरोगी राहण्याचे कारण सांगितले जाते.
tamilnadu2
मंदिराच्या परंपरेनुसार येथील ज्येष्ठ नागरिक पहिल्यांदा हातात बांगड्या भरतात आणि दिवसभर उपवास करतात. त्यानंतर ते आपले मुंडण करुन घेतात. पुढे येथील पुजारी त्यांची देवी-देवतांप्रमाणे पुजा करतात. त्यांचा विविध साहित्य-सामग्रीने अभिषेक केला जातो. त्यात चंदन, कुसकरलेली फुले यांचा समावेश असतो. त्यानंतर त्यांचा मिरचीच्या पावडरने अभिषेक केला जातो. त्यातील तिघांना मिरचीचा लेप लावून त्यांना आंघोळ घातली जाते. तत्पूर्वी त्यांना हा मिरचीचा लेप खाऊ घातला जातो. त्यानंतर शेवटी त्यांना कडूंलिंबाच्या पाण्याने आंघोळ घालून मंदिरात घेतले जाते. जिथे त्यांना जळत्या कोळश्यावर चालावे लागते. हि प्रथा मागील 85 वर्षांपासून सुरु असल्याचे येथील स्थानिक नागरिक सांगतात.
tamilnadu3
यामागील आख्यायिका अशी आहे की 1930मध्ये हरिश्रीनिवासन यांना भगवंताने स्वतःहून दर्शन देऊन येथील नागरिकांना आजारापासून दूर ठेवण्यासाठी ही परंपरा सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून आजमितीस ही परंपरा येथे सुरु आहे.

Leave a Comment