अभिनेत्री शमिता शेट्टीच्या गाडीला अपघात - Majha Paper

अभिनेत्री शमिता शेट्टीच्या गाडीला अपघात

shamita-shettyमुंबई –  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी हिच्या गाडीला तीन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलने धडक दिली. या धडकेनंतर तिच्या ड्रायव्हरलाही मारहाण करण्यात आली.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ठाण्यातील विवियाना मॉलजवळ ही घटना घडली आहे. शमिता शेट्टीने याबाबत राबोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तिच्या ड्रायव्हरच्या जबाबावरून पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

शमिता शेट्टीने मोहब्बते या सारख्या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र शमिताच्या या चित्रपटानंतर ती फार कमी चित्रपटांमध्ये झळकली. चित्रपटांनंतर शमिताने तिचा मोर्चा वेब सीरिजकडे वळविला होता. ‘यो के हुआ ब्रो’ या वेब सीरिजमध्ये ती झळकली होती. त्यानंतर ‘खतरों के खिलाडी’च्या ९ व्या पर्वातही तिने सहभाग घेतला होता.

Leave a Comment