कुंभमेळ्यातील साधु-संतांना रामदेव बाबांची धुम्रपान थांबवण्याची विनंती

ramdev-baba
प्रयागराज – योगगुरु रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यातील साधु-संतांना धुम्रपान करणे थांबवा अशी विनंती केली आहे. भगवान राम आणि कृष्ण यांना आपण आदर्श मानतो. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीच धुम्रपान केले नाही. मग आपण का करायचे? धुम्रपान करणे आपण थाबंवायला हवे, अशी विनंती बाबा रामदेव यांनी साधू-संतांना केली.

आई, वडील आणि आपले घर आपण साधू सोडतो. मग धुम्रपान आपण का सोडू नये, असेही बाबा म्हणाले. बाबा रामदेव यांनी कुंभमेळ्यातील साधूंकडून ‘चिल्लम’ गोळा केली. मी म्युझियम बांधणार असून त्याठिकाणी जमा केलेल्या सर्व ‘चिल्लम’ ठेवण्यात येतील. मी अनेक तरुणांच्या सिगारेट सोडवल्या आहेत. मग महात्मा लोकांच्या का नाहीत?, असेही बाबा रामदेव म्हणाले. कुंभमेळा ४ मार्च रोजी संपत आहे. गंगा नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी याठिकाणी लाखो भाविक येत असतात.

Leave a Comment