आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

budget
नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून मोदी सरकारचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे ते अंतरिम अर्थसंकल्प मांडण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, विरोधी पक्ष संपूर्ण अधिवेशन काळामध्ये सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर, विरोधकांना उत्तर देण्याची सरकारनेही तयारी पूर्ण केली आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन चालेल.

राफेल प्रकणावरुन विरोधक वर्तमान लोकसभेच्या अंतिम सत्रामध्ये सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. पण यावर उत्तर देण्याची जय्यत तयारी सरकारनेही केली आहे. तसेच नोटाबंदीने कथित बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे, असा अहवाल सांख्यिकीय आयोग प्रसिद्ध करणार होते. मात्र, सरकारने हा अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. या प्रकरणावरही विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे १३ पॉईंट रोस्टर विद्यापीठांवर नियुक्तीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने लागू केले आहे. त्या रोस्टविरोधात सरकारवर दबाव आणण्याची तयारीही विरोधकांनी केली आहे. एकंदरीत संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन वाद विवादाचे ठरणार, असल्याची चिन्हे दिसत आहेत.

मोदी सरकारचा हा सहावा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती बरी नसल्याने पियुष गोयल अर्थसंकल्प मांडतील. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंतच्या मुदतीपर्यंतचा ताळेबंद मांडला जाईल. त्यात संबंधित काळतील खर्च आणि महसुलाचाही तपशील देण्यात येईल.

Leave a Comment