या व्यक्तिने निवृत्त होईपर्यंत घेतली नाही एकही सुट्टी, निवृत्तीवेळी मिळाले 21 कोटी रुपये

anil-naik
खाजगी बोला किंवा सरकारी नोकरीत कर्मचा-यांचा सुट्टयांना घेऊन खुप पंगा होत असतो. पण आम्ही आज तुम्हाला अशा एका व्यक्तिबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी आपल्या नोकरीच्या दरम्यान कधीही सुट्टी घेतली आणि निवृत्तीच्या वेळी त्यांना तब्बल 21 कोटी रुपये भेटले आहेत. विश्वास नाही ना बसत… पण हे खरे आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ती व्यक्ति.

तुम्हाला माहितच असेल की जगभरात भारतीय कामगारांची काम प्रति असलेल्या निष्ठेची कायम प्रशंसा केली जाते. जास्तकरुन भारतीय कर्मचारी त्यांना आजारपणासाठी दिली गेलेली सुट्टी घेत नाही आणि वर्षाअखेर ते या सुट्ट्यांचे पैसे घेतात. असेच एक भारतीय कर्मचारी आहेत ज्यांना आपल्या कार्यकाळात आजारपणाच्या सुट्टीतून तब्बल 21 कोटी रुपये कमावले आहेत. अनिल मणिभाई नायक असे त्यांचे नाव आहे. अनिल नायक नुकतेच लार्सन अँड टूब्रोमधून (एल अँड टी) मधुन निवृत्त झाले आहेत. ते या कंपनीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. कंपनीत त्यांनी आपल्या कार्यकाळात न घेतलेल्या सुट्ट्यांच्या मोबद्दल्यात त्यांना तब्बल 21 कोटी रुपये भेटणार आहेत. लार्सन अँड टूब्रोच्या यशात खारीचा वाट उचलणा-या अनिल नायक यांचे नाव केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कारासाठी नामंकित केले आहे.

1965 साली अनिल नायक यांनी लार्सन अँड टूब्रो कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून कामास सुरुवात केली. यापूर्वी त्यांना 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. एल अँड टीच्या वार्षिक अहवालात 2017-18 नुसार सुट्ट्या न घेतल्यामुळे नायक यांना 21.33 कोटी रुपये भेटणार आहेत. त्याचबरोबर नायक यांना ग्रॅच्युएटी आणि इतर सुविधांच्या माध्यमातून जवळपास 100 कोटी रुपये भेटणार आहेत.

Leave a Comment