चीनच्या आर्थिक हेरगिरीची आमच्याकडे अनेक प्रकरणे : एफबीआय प्रमुख

FBI
चीनकडून अमेरिकेत होणाऱ्या आर्थिक हेरगिरीची डझनावारी प्रकरणे आमच्याकडे असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. अमेरिकेतील आमच्या जववळपास सर्व 56 कार्यालयांमध्ये या प्रकरणांचा तपास सुरू आहे, असे अमेरिकेची तपास संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने म्हटले आहे.

अमेरिकी संसदेच्या गुप्तचर समितीसमोर एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांची साक्ष झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. अमेरिकेला जगभरात असलेल्या धोक्यांबद्दल या सुनावणीत समितीच्या सदस्यांनी माहिती घेतली.

“प्रतिहेरगिरीच्या दृष्टीने चीन हा आपल्यासाठी सर्वात लक्षणीय धोका आहे, असे मला वाटते. उदाहरणार्थ आमच्याकडे आर्थिक हेरगिरीची प्रकरणे आहेत. आमच्या 56 फील्ड ऑफिसपैकी जवळपास सर्व कार्यालयांत ही प्रकरणे आहेत आणि हा केवळ एक भाग आहे,” असे असे रे म्हणाले.

“गेल्या तीन किंवा चार वर्षांमध्ये त्यांची संख्या कदाचित दुप्पटीने वाढली आहे. त्यापैकी सर्वच नाही तरी जवळपास सर्वच प्रकरणांचा छडा चीनपर्यंत जातो,”असे रे म्हणाले.

हेरगिरीच्या दृष्टीने अन्य कोणत्याही धोक्यापेक्षा चीनचा धोका अधिक गहन, अधिक वैविध्यपूर्ण, अधिक वेदनादायक, अधिक आव्हानात्मक, अधिक व्यापक आणि अधिक चिंतादायक आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Comment