ईडी नोटीसचा दावा राहत फतेह अली खान यांनी फेटाळला

fateh-ali-khan

पाकिस्तानी प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांच्यावर परकीय चलनाची तस्करी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीकडून खान यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र राहत फतेह अली खान यांनी भारत सरकारकडून आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, राहत फतेह अली खान यांचे मॅनेजर आमिर हसन म्हणाले की, ‘आम्हाला अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही. आधी नोटीस पाठवा आणि नंतर आम्ही त्यावर उत्तर देऊ.’

ईडी मात्र या उत्तराने संतुष्ट नाही. ईडी त्याच्यावर ३०० टक्के दंड आकारु शकतो. तसेच भारतात लूक आऊट नोटीस देखील जारी केली जाऊ शकते.

Leave a Comment