पत्नीमुळे विराटने केला दुग्धजन्य पदार्थांचा केला त्याग

virat-kohli
आपल्या फिटनेससाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ओळखला जातो. तो स्वतः फिट राहून इतर खेळाडूंना फिट राहण्यासाठी प्रेरणा देतो. तो यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देतो. आता त्याने पूर्णपणे शाकाहारी होण्यासाठी अमेरिकन व्हेगन संकल्पनेप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ न खाण्याचे ठरवले आहे. त्याची पत्नी अनुष्कामुळे हा बदल झाला आहे.

अमेरिकेत व्हेगन या कडक शाकाहारी संकल्पनेप्रमाणे दूध हे प्राण्यांच्या शरीरापासून मिळते, त्यामुळे ते मांसाहारी ठरते. फिटनेससाठी आणि मनशांततेसाठी विराटने मांसाहार सोडून दिला आहे. पूर्णपणे शाकाहारी बनण्यासाठी त्याने आता दुग्धजन्य पदार्थ खाणे सोडून दिले आहे.

फळे, भाज्या, डाळ आणि ड्रायफ्रुटचा व्हेगन आहारात प्रामुख्याने समावेश करण्यात येतो. तर, रॉ व्हेगन आहारात कच्ची फळे, कच्या भाज्या आणि नैसर्गिक वनस्पतींपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. व्हेगन आहारामुळे मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात. वजन कमी करण्यास व्हेगन आहार फायदेशीर ठरतो. याबरोबरच शरीरातील अवयवांचे कार्य सुरळीत करणे आणि वेदना कमी करण्यास व्हेगन आहार फायदेशीर ठरतो.

विराट याआधी पूर्ण मांसाहारी आहार घ्यायचा. त्याने यापूर्वी आवडत्या बटर चिकनचा त्याग केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे विराटला बिर्याणी, चिकन आणि अंडी खूप आवडतात. पण, त्याने फिटनेससाठी मांसाहार वर्ज्य केला होता. विराटने २०१२ सालापासून मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे सोडले होते. त्याच्या आहारात प्रामुख्याने उकडलेल्या पदार्थांचा समावेश असतो.

Leave a Comment