केंद्राने नाकारला आलोक वर्मा यांचा राजीनामा

alok-verma
नवी दिल्ली – केंद्र सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी संचालक आलोक वर्मा यांनी नव्या खात्याचा दिलेला राजीनामा नाकारल्यामुळे ते आज निवृत्त होत असतानाही कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सीबीआय भ्रष्टाचार प्रकरणात संचालक पद बहाल केल्यानंतर त्यांची बदली फायर सेवा, नागरी सुरक्षा आणि होमगार्ड या खात्यात करण्यात आली होती.

आज आलोक वर्मा सेवा निवृत्त होत आहेत. त्यांची फायर सेवा, नागरी सुरक्षा आणि होमगार्ड या खात्यात संचालक पदावर बदली करण्यात आली होती. त्यांनी त्यावेळी या पदाचा राजीनामा दिला होता. पण त्यांच्या राजीनाम्यावर केंद्राने तब्बल १० दिवसानंतर उत्तर दिले आहे. त्यांचा राजीनामा नामंजूर करुन त्यांना कोणत्याही परिस्थितीत कामावर रुजू होण्याचे संकेत दिले आहे. आलोक वर्मा यांची बदली ज्या पदावर करण्यात आली होती. त्या पदासाठी असलेले ठराविक वय त्यांनी ओलांडले आहे. त्यानंतरही त्यांना या पदावर बदली करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा केंद्राकडे दिला होता.

आलोक वर्मा यांना सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यांनी त्यानंतर याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करत ९ जानेवारीला त्यांना सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे संचालक पद बहाल केले होते. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी १० जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील निवड समितीने त्यांची बदली फायर सेवा, नागरी सुरक्षा आणि होमगार्ड या खात्यात संचालक पदावर केली होती.

Leave a Comment