शारीरिक कमजोरी दूर करेल सीताफळाचे सेवन

sitafal2
सीताफळ हे भारतात सर्वत्र मिळणारे पण काहीसे दुर्लक्षित राहिलेले फळ आहे. हे फळ अनेक गुणांनी युक्त असून रोज एक सीताफळ खाल्ले तर त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे मिळतात. मुख्य म्हणजे शारीरिक दुर्बलता दूर करून शरीर पुष्ट बनविण्यासाठी ते फार उपयोगी आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम हे फळ करते.

sitafal
शरीराला आलेला थकवा आणि सुस्ती सीताफळ दूर करते. त्यात अँटीऑक्सिडन्ट आणि खनिजे भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे आजारापासून संरक्षण करण्यास ते उपयोगी आहे आणि सीताफळ उर्जेचा चांगला स्रोत आहे. त्यात बी व्हिटामिन भरपूर प्रमाणात आहे. सीताफळ मेंदूच्या शांतीसाठी फार चांगले असून त्यामुळे चिडचिड, राग दूर होतो आणि मेंदू शांत राहतो.

sitafal1
ज्यांना रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया आहे त्यांनी सीताफळ अवश्य खावे त्यामुळे अशक्तपणा जातो आणि शरीर पुष्ट बनते. सीताफळातील मॅग्नेशीयम शरीरातील पाण्याचे संतुलन राखते आणि सांध्यामध्ये तयार होणारे आम्ल कमी करते. त्यामुळे संधिवात होत नाही. सीताफळात कॅल्शियम आहे आणि सी व्हिटामिन आहे. त्यामुळे दात दुखणे, हिरड्यांची सूज कमी होते, सीताफळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवते त्यामुळे मधुमेही लोकांनी त्याचे सेवन करावे. यातील सोडियम, पोटॅशीयम रक्तप्रवाह सुरळीत राखते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. सीताफळ डोळ्याच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे.

Leave a Comment