बंगलोर एअर शो मध्ये राफेलचे उड्डाण

rafale
फ्रांसच्या एरोस्पेस दासाँ एव्हीएशनची राफेल लढाऊ विमाने बंगलोर येथे २० ते २४ फेब्रुवारी मध्ये होत असलेल्या एअर शो मध्ये भारतीय आकाशात झेप घेणार आहेत. बंगलोरच्या हवाई दलाच्या येलहांका एर फोर्स स्टेशनचे प्रमुख एअर कमांडर खुरी शीतल यांनी पत्रकारांना हि माहिती दिली. ते म्हणाले या शो मध्ये तीन राफेल विमाने सहभागी होत असून त्यातील दोन प्रत्यक्ष उड्डाण करतील तर एक नुसते पाहता येईल. बंगलोर येथे होत असलेला हा १२ वा एअर शो आहे.

दोन इंजिने असलेले राफेल मल्टीरोल लढाऊ विमान आहे. ते हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम आहे. ही विमाने फोर्थ जनरेशनची असून भारतीय हवाई दल अशी ३६ विमाने खरेदी करत असून ती सप्टेंबर २०१९ मध्ये मिळणार आहेत. यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. या विमानच्या खरेदी सौद्यामुळे साध्य भारतातील राजकारण तापले असून हा खरेदी व्यवहार वादात सापडला आहे.

Leave a Comment